शाळा
मी रोहित मांडगे. धर्मप्रकाश श्रीनिवासैय्या हाय स्कूल चा विद्यार्थी. आज मला शाळा सोडून साधारण १० वर्षे झाली. २००६ मध्ये मी दहावी पास झालो या शाळेतून. या शाळेचं आणि माझं नातं खूपच अतूट आहे. कुर्ल्यातील एका छोट्या चाळीतला मुलगा आज अमेरिकेला येऊन Master of Computer Science झाला, Amazon सारख्या मोठ्या कंपनी मध्ये जॉबला लागला, त्याचं श्रेय माझ्या आई वडिलांना, माझ्या शिक्षकांना, माझ्या मित्रांना आणि या माझ्या शाळेला जातं. खरंच या शाळेनेच मला घडवला असा म्हणेन मी. त्यासाठी मी माझ्या शाळेचा आजन्म ऋणी राहेन. लहानपणापासूनच मी खूपच खट्याळ मुलगा होतो. इतका मस्तीखोर असून सुद्धा बालवाडी मधल्या शुभांगी ताई, छोटया शिशुच्या शारदा ताई आणि मोठ्या शिशुच्या स्वाती ताई या सर्वांनी खूप प्रेम दिलं. पहिली ते चौथी मध्ये असा एकही दिवस नसेल जेव्हा मी शिक्षकांचा ओरडा किंवा मार खाल्ला नसेल. ते सगळं माझ्या चांगल्यासाठीच होतं म्हणा. स्वप्नीला पवार बाई, परब बाई, भोसेकर बाई, कुलकर्णी बाई, जाधव बाई यांनी मला खरंच खूप सांभाळून घेतलं. गणित हा माझा खूपच जिवलग असा विषय. माझा आजही तेवढाच प्रेम आहे या विषयावर. त्यातच पा...