प्रश्न
दुःखाने गहिवरलेल्या मनातील प्रश्न आयुष्यासमोर मांडतो मी, आयुष्याच्या आठवणींमध्ये त्यांची उत्तरे माझीच शोधतो मी एकांतात चालताना, स्वतःमध्ये रमताना, आठवणी हळूच मनात सरसावतात, किती चुकले, काय चुकले, कसे चुकले, यांचा पूर्ण हिशोब मागतात असे म्हणतात की गेले ते दिवस, आणि राहिल्या त्या आठवणी, पण स्वप्नांचा पाठलाग करताना सोबतच नाही राहिलं कुणी कुणी असो अथवा नसो, या आठवणी मात्र साथ सोडत नाहीत, आणि शेवटी फक्त उरतात प्रश्न, उत्तरे मात्र मिळत नाहीत